Friday, January 17, 2014

संध्या छाया





क्षिती किरणे अस्ताला दारावरी

झिरपले अंतराळ गडद वरी 

मेघांनी किरणांचा पान्हा प्यायला   

बगळ्यांचा उडत निघाला भाला



वेशीवर काळोखाचा बोलबाला

अनिलाचा पतंग कुठे कटला?

हरवत गेला वृक्ष रंग ओला

ओढतोय अंधार आपुला शेला

  

निशेचा भरेल दरबार दारा

कलकलत्या दारी शुक्राचा तारा

चंद्राचं आगमन लांबत गेल

तारकांनी नकाशी जाळ विणल



जीवन प्रहर एक संथ झालं

झुळुकेला रातराणीने शोधलं

खोल शांतीने पांघरूण घातलं

भटकं मन निर्धास्त विसावल

रचना: हेमंत केतकर

No comments:

Post a Comment