Thursday, January 16, 2014

तू सुखी रहा!


आकाशभर निळा रंग
पांढरे ढग तुरळक दंग
पानांमागे काळोख गुंग
आठवणींचा असा संग .....

टेकडीवरती एकटाच वृक्ष
भिरभिर पाखरू त्यास साक्ष
नजरेत तुझ्या तो भाव दक्ष
आठवांचा मी उघडला कक्ष......

मेघांचे जेव्हा हसे झाले
ओरडत सुटले तेरा कोल्हे
इंद्रधनू मग विलया गेले
मोडून आनंदी सारे झुले ......

झुल्यावरचे सुखद क्षण
वाटून घेतले पराग कण
भारले चिंब मनाचे खण
आता दुखतात काही व्रण.....

अंगणा मधील ओले धुके
सुटलेले तुझे शरीर फिके
डोळ्यात भाव काळीज चुके
ओळख देताच खाली झुके .....

आली जशी गेलीस तशी
माशी शिंकली कुठे कशी
प्रेमाला ना पडलीस फशी
ऐश्वर्यावर पहुडलीस अशी......

तू सुखी रहा
तू सुखी रहा ....
रचना: हेमंत केतकर

No comments:

Post a Comment