Thursday, January 16, 2014

शब्दात काय सांगू ?


शब्दात काय सांगू , हृदयात वाच माझ्या
मन काय कौल देते, बघ अंतरात माझ्या ||धृ ||
जे भाव विश्व अपुले, डोळ्यात कोंडले तू
माझ्यासमोर येता, अवचित सांडले तू ||1||
तुज प्रश्न काय पडला, अवलोकुनी चकोरा
आधार गलबताचा, का शोधिशी किनारा ||2||
निघता प्रिये प्रवासा, साथीस एक तारा
तिष्ठून वाट बघतो, युग नेक मीच न्यारा ||3||
वाटा अनेक भासे, जरी त्या तुला मिळाल्या
घेऊन येत अंती, अपुल्याच मीलनाला||४||
रचना हेमंत केतकर

No comments:

Post a Comment