Thursday, January 16, 2014

"मनात"

"मनात"
मन मनात घुसळत होते
मी कोठून आलो पुसते
जाईन कधी मी कोठे
हे प्रश्न विचारत मोठे ......

मन मनात विचरत होते
प्रश्नांत शांत मन खंगे
ते उत्तर शोधीत संगे
अन घडवीत होते दंगे ......

मन मनात काहूर उठले
ते अल्लड असते कवळे
का तुटून पडती सगळे
प्रश्नोत्तर कधी न निवळे......

मन मनात पुलकित गाते
बुद्धीस मान्य जे नसते
मन कुणा जुमानत नव्हते
ते स्वप्ना बिलगत होते.......

मन मेघासम जे झाले
वायु ने भिर-भिरलेले
जल कुंभानी जे भरले
जे अविरत भटकत होते, ते अविरत बरसत होते......
रचना: हेमंत केतकर

No comments:

Post a Comment