मी लाख दिलांची राणी
जणू शुक्राची भोर चांदणी
सख्या हरींची वाटेत ठाणी
किती मधुर माझी गाणी गं s s ग ग ग
पिवळी धमक मोत्यांची रास
हिरव्या रानाचा हिरवा श्वास
कशापाई घेतला वो ध्यास
जशी नक्षीची गुलाबदाणी गं s s ग ग ग
वळणा वळणान धावतीया वाट
चाल माझी जणू नदीचा काठ
तिरप्या डोळ्यांचा काजळी घाट
पाठीवर नाचे माझ्या वेणी गं s s ग ग ग
तुम्हा उनाडांशी रोजची गाठ
नजरा ओघळती फिरता पाठ
माझ्या डोईवर जड झाला माठ
तुमच्या काळजाच भरुनी पाणी गं s s ग ग ग
रचना: हेमंत केतकर
No comments:
Post a Comment