कोहम
हासता जर मी स्वतःशी
जग म्हणे वेडे मला
भाव त्यांच्या अंतरी ते
उमजती सारे मला
बासरी मम हृदयातली हि
सूर देई मज हवा
काय सांगू जन जनांसी
लौकिकी गढले सदा
गुप्त वसले अंतरी जे तव
स्पंदना ऐकाल का?
वेड माझ्या अंतरातील
तुम्हासही उमजेल का?
श्वास घेता ऐकू येई
अहं मी - मीच मी
सोडताना बाहेरही
तोच मी तोच मी
रचना: हेमंत केतकर
No comments:
Post a Comment