मनमाड ५० वर्षांपूर्वीचे
कोळशाच्या धुराच्या झेन्ड्यानी धुरकट लेले
रेल्वे इंजीनानांच्या शिट्ट्यात दुमदुम लेले
स्टेशनच्या कडेने बिलगलेलं माझं गाव मनमाड
जेव्हा पहिल्या पावसात न्हाऊन भिजून जातात
सरळ धावणाऱ्या अरुंद पण प्रामाणिक वाटा
भल्या माणसांचा सहवास नांदत असतो त्यांच्या काठा
रामगुळणेचे पाणी खळाळत गाते गोड गाणी
दूरवर शांततेला साद देत असते एक घंटा राणी
तर आनंद शिंपडीत जाते वाऱ्याची अत्तरदाणी
नागापूरचा महादेव आठवतो दर श्रावणी सोमवारी
शिंगव्याचा छोटा डोंगर बोलावतो जत्रेच्या गुरुवारी
अणकाइचा किल्ला आव्हानं देत राहतो रविवारी
तर बगलेतला रेल्वे बंधारा हजर रोज सायंकाळी
दत्त मन्दिरामागच माझं क्रिकेटच विस्तीर्ण मैदान
प्रत्येक दगडाखाली असते विंचवाच्या बिर्हाडाच ठाण
तरीही हरवते घोंघावत्या वाऱ्यात प्रेमी युगलांच भान
केलंय किती हो खेळताना आम्ही बालमित्रांनी जीवाचं रान
अठरा पगड जातींच्या वस्तीत घर माझं "मंगलधाम"
येणाऱ्या प्रत्येकाच्या मनाला मिळायचा मोठा विश्राम
श्वान,गाय, पोपट, मुंगुस, मांजर, वानर यांनाही ते आधार
आजही दरवळतो तेथे घालून घेतलेल्या आदर्शांचा श्वास
आमच्या साऱ्यांच्या साथीला प्राणिमात्रांची ती साथ
नाही उणीव लौकिकाची जेथे मित्र निसर्गाचा वास
माझ्या जन्माची ती पहाट बाल्य सोडण्याची आस
वाढीत राहो माझ्या मनाचा हा माड मना एक ध्यास
रचना: हेमंत केतकर

No comments:
Post a Comment