Thursday, January 16, 2014

पुढारी



असा कधीतरी पहिला मी अस्सल एक पुढारी
वाटून गेले होऊ आपण? नसू जरी अडाणी...
बनलो मी हि एक पुढारी .......

डोक्यावरती टोपी ओढतो हसतो ढोंगी मुखाफाकतो
हात जोडूनी या s या s म्हणतो फेकुनी पानाची पिचकारी ......

कसच कसच उगाच म्हणता सांगून जातो काही प्रौढी
कधी मक्ख मी तुम्हा ऐकतो शिव्याच देतो फिरता पाठी ....

कपड्यासाठी किमती खादी टाळ्यांचा मी एकाच वाली
शब्दांवर जरी मी किती तोतरा पण राव किती भाषणे केली!......

इमले बंगले माझ्या नावी जमिनीसाठी सिलिंग नाही
सुशिकशितांची कशास भीती असता गुंड मवाली पदरी......

शेतीमधुनी सोने पिकता कामकर्यांच्या माना झुकती
उसात माझ्या साखर राणी बाई- बाटली दुर्मिळ नाही......

हसत बोलतो तिन्ही त्रिकाळी विरोध होता काटा काढुनी
चेला निर्भय !! पूज्य बापुजी ? का मग वाटुनी घ्यावी भीती?.....

राजकारणी जाती पाती वाशिल्यासाठी नाती गोती
काम जमविता सगळे राजी सदा ऐकतो हांजी s हांजी s ......

सत्य बोलती पेपरवाले वार्ताहर भासे चतुर कोल्हे
धाक आमिषे परजून शस्त्रे पणा लावतो मी चतुराई......

रचना: हेमंत केतकर, २ ऑक्टोबर १९८१

No comments:

Post a Comment