कशी नशिबानी थट्टा आज मांडली
माझ्या भारताची दशा काय जाहली || धृ ||
पुण्यवंत होता देश पुण्यवान लोक (२)
पराक्रमी राजे होते सत्वशील संत (२)
त्यांची पुस्तकीच नोंद फक्त राहिली कशी .....
अयोध्यापुरीला होते राघवाचे राज्य (२)
छत्र पती शिवरायांचा अनाथा आधार (२)
त्यांची राजकीय पोळी का हो भाजली कशी .....
इथे तृप्त अंतःकरणे श्रमाला उदार (२)
मान खाली घालूनी बघती पुढार्यांचे खेळ (२)
या मर्कटानि टोपी त्यांना घातली कशी .....
आश्रमात होत्या शाळा गुरु सत्यनिष्ठ (२)
शिष्य त्यास लाभायचे अधिक तत्वनिष्ठ (२)
का मग शिक्षकाची बुद्धी आज गोठली कशी ......
रचना: हेमंत केतकर
No comments:
Post a Comment