चातक थकले वाट पाहुनी
लखलखणार्या मल्हारातुनी
वीज म्हणाली धरतीला
आले अवचित भेटाया.......
अंबर भरले जल मेघांनी
रविराजाला कुशी दडवूनी
मोर खुलवल्या रंग पिसांनी
थुई,थुई,थुई नाचला ......
अवकाशातील मेघा पिंजुनी
वरी पहुडले तन्मय होऊनी
आस अंतरी तरी उसळली
प्रकाश लखलखला........
तृप्त धरित्री धुंद गायनी
तृणपात्याची हिरवळ व्याली
व्याकूळलेल्या नवसृजनातुनी
निनाद दमदुमला.......
रचना: हेमंत केतकर, पुणे
No comments:
Post a Comment