थांब राधे कळले का वेणू नाद रंगला
पैंजणाचा नाद तुझा बासरीने ऐकला ........
गोप गाव श्रमलेला संध्येला पहुडला
अशा वेळी गोपींचा उडे काय गलबला..........
चिंब भिजुनी या धुनी, चैत्र वात बोलला
गायी गुरे ओढी खुरे वास त्यांस लागला .........
शामांगी मेघ एक सरोवरी पसरला
मुरलीच्या ओढीने निळा डोह उसळला ...........
पल्लवित वृक्ष आज नादब्रह्मी डोलला
रंगानी फुलून तो स्वागतास बहरला ............
कृष्णसखा लाडका ग तुझा तुला भेटला
मौनाचा, रूसव्याचा हट्ट कसा मोडला ..........
रचना: हेमंत केतकर
No comments:
Post a Comment