आई
अशीच होती माय माउली
भावंडांची तृप्त साउली
साधी भोळी एक "वर्हाडी"
अल्प शिक्षित परी ती ज्ञानी |
संसाराचा भव्य पसारा
कष्टांचा तो अविरत मारा
प्रत्येकाचा विशिष्ट तोरा
कुणास ठाऊक कसा तोलला |
आठ जिभांचे विविध चोचले
मुला मुलींचे रुसून बसणे
कसे निभाऊन नेले तिने
अल्प धनी आनंदी जीणे|
पतिराजांचा बाणा मानी
माहेराची नाती ओली
सरस्वती वृद्धिंगत केली
म्हणून तळपते अमुची वाणी |
आम्ही बुद्धी रोज परजतो
स्वःतास ज्ञानी उगा ठरवतो
लळा जिव्हाळा हरवून बसतो
परी तिज वाचून गडबडतो |
अशीच आठवण मनात येई
होईन कैसा कधी उतराई
तिच्या जिवा ने मोक्षद्वारी
हीच प्रार्थना देवापायी |
रचना हेमंत केतकर
@@@@@@@@
अशीच होती माय माउली
भावंडांची तृप्त साउली
साधी भोळी एक "वर्हाडी"
अल्प शिक्षित परी ती ज्ञानी |
संसाराचा भव्य पसारा
कष्टांचा तो अविरत मारा
प्रत्येकाचा विशिष्ट तोरा
कुणास ठाऊक कसा तोलला |
आठ जिभांचे विविध चोचले
मुला मुलींचे रुसून बसणे
कसे निभाऊन नेले तिने
अल्प धनी आनंदी जीणे|
पतिराजांचा बाणा मानी
माहेराची नाती ओली
सरस्वती वृद्धिंगत केली
म्हणून तळपते अमुची वाणी |
आम्ही बुद्धी रोज परजतो
स्वःतास ज्ञानी उगा ठरवतो
लळा जिव्हाळा हरवून बसतो
परी तिज वाचून गडबडतो |
अशीच आठवण मनात येई
होईन कैसा कधी उतराई
तिच्या जिवा ने मोक्षद्वारी
हीच प्रार्थना देवापायी |
रचना हेमंत केतकर
@@@@@@@@
No comments:
Post a Comment