तुला मी पहिले तेव्हा, नदीला पूर आलेला
बटांतून चंद्र लपलेला, असा मज भास का झाला?
तुफानी वादळी वारा, किनारी धडकत्या लाटा
तटाला उजळल्या होड्या, असा तुज भास का झाला?
तळाशी दानवांमध्ये, मिसळले देवही होते
कुणाला शरणागत व्हावे, कुणावर भार टाकावा?
असा तुज प्रश्न पडलेला, मला तू पहिले जेव्हा
किनारी बोलवा झाला, तुझा मी हात का धरला?
पुराचा जोर ओसरला, जळावर हंस अवतरला
तरंगी तीर का सुटला, मनातून खोल का रुतला?
रचना: हेमंत केतकर
No comments:
Post a Comment