Thursday, January 16, 2014

पर्जन्याचे पाऊस गायन



पक्षांचे लगबग उडणे
सृष्टीचे हरित बहरणे
अशाढाचे अविरत देणे
पर्जन्याचे पाऊस गायन......

सरी वर्षती असे सर्वदा
ढग आच्छादन कितीकदा
सुर्य उन्हाला कैद आपदा
पर्जन्याचे पाऊस गायन......

श्रावण धारा नित्यहि संगे
उन्हे पाऊसी मानस रंगे
फुलाफुलांचे रंगीत दंगे
पर्जन्याचे पाऊस गायन......

भाद्रपदी या गणेश वंदा
हस्त बरसते पाण्या बंदा
दिवाळीस द्या निरोप यंदा
पर्जन्याचे पाऊस गायन......
रचना: हेमंत केतकर

No comments:

Post a Comment