Thursday, January 16, 2014

धुंदी



धुंदी
पुन्हा एकटी सायंकाळी
धुंद सुगंधित गाफील वेळी
लटक्या लाडे होऊन वेली
शिशिर तरुला बिलगु नको ग
या प्रीतीला  छेडू नको ……..

गाल तुझे ग लाल गुलाबी
डोळ्यामधले शराब पाणी
ओठावरती हसून कळी
अंतरातून लाजू नको ग .........

शब्द तुझे ग मार्दव गाणी
इश्य इश्य हि मंजुळ वाणी
सहवासातुनी अत्तरदाणी
माझ्यावरती उडवू नको ग ........

रागावीशी धुसपुसते वेणी
चाल तुझी ग उडते वेणी
झटका मारून उगाच राणी
मला दावणी बांधू नको ग .........

हृदयि तुझिया असो विराणी
घेऊन येईन रात्र चांदणी
भुलून जाऊन एक लावणी
मला ऐकवून पाहू नको ग.......

रचना: हेमंत केतकर

No comments:

Post a Comment