Thursday, January 16, 2014

सांज


सांज ही खगांची
भटकत्या ढगांची
उधळण रंगांची
भावते मनाला |
सांज युगलांची
लांब सावल्यांची
श्रम- हर सुखाची
लाभते जीवाला |
सांज ती रवीची
हमी परतण्याची
पांघर छायेची
हरपते मनाला |
ओढ ती घराची
फिकट तारकांची
भेट जिवलगांची
खुणावते जीवाला |
रचना हेमंत केतकर

No comments:

Post a Comment