Thursday, January 16, 2014

निसर्ग चक्र


ऋतूंनी चक्रात फिरायचे असते
सृष्ठीला सर्व जगवायचे असते
सूर्याने उन्ह शिंपडायचे असते
मातीने भाजून निघायचे असते
बर्फाने हळू वितळायचे असते
पावसाने कुठे बरसायचे असते
कळीने गुपचूप उमलायचे असते
पाकळ्यांनी रंग वाटायचे असते
फुलांनी गंध उधळायचे असते
कोषानी मध साठवायचे असते
पक्षी कीटकांनी विहारायचे असते
चहूकडे पराग विखरायचे असते
फळांनी पुष्ठ पिकत जायचे असते
आणि जीवांना जगवायचे असते
वृक्ष लतांनी रोज वाढायचे असते
खोडांनी फांद्याना पेलायचे असते
पानांनी अन्नास बनवायचे असते
थंडीत निमूटपणे गळायचे असते
झाडांनी छायेस पांघरायचे असते
बियांनी एकवार रुजायचे असते
मग मानवाने काय करायचे असते?
चक्रा फक्त फिरू द्यायचे असते, चक्रा फक्त फिरू द्यायचे असते
रचना: हेमंत केतकर

No comments:

Post a Comment