स्वप्नील कल्पवृक्षा, बघतो
तुला कितीदा
छायेत दाट तुझिया देशील का
विसावा ?
किती रुक्ष हा उन्हाळा, शोधू
कुठे निवारा?
मन आर्त साद देते तव स्थित
प्रज्ञतेला
हिरवे तुझे सुपर्ण, वरुनी
निळे आभाळ
छायेत तेज दाटे, लपवित सूर्यकिरण
फुललास तू नि हसला, हलके
सुगंधी वारा
क्षण एक तुजसी बघता संजीवन
ये मनाला
रचना: हेमंत केतकर
No comments:
Post a Comment