सांग सखे कोठे गेली मनोमन प्रीत
सांग कसे सरले आपुले जीवनाचे गीत
सांग सखे कोठे विरले मोतियाचे हास्य
सांग कसे तुटले तुझिया नजरेचे धनुष्य
सांग सखे कोठे गळले शपथांचे द्रोण
सांग कसे पेटून उठले वादळी भांडण
सांग सखे कोठे विझले शीतल चांदण
सांग कसे झिरपून गेले आनंदाचे क्षण
एकवार तोडून बेड्या होशील का तू मुक्त
दिप्त मने तू यावे फिरुनी इच्छा एकच सुप्त
रचना: हेमंत केतकर
No comments:
Post a Comment