Thursday, January 16, 2014

पुनर्भेट


भाग्य माझे भेटली तू ती सांज होती बावरी
स्वप्न माझे सत्य झाले राजसा मज अंतरी
गंध वेडी वेळ होती नि पश्चिमेला कोर ती .......

हासला तू बोलला कि समजले नाही मला
खुण गत जन्मिची उमजली मज त्या क्षणा.....

भाव रेखा रेखुनी तू बांधले ग का मला
कमलनयनी पापण्यावर स्नेह ओसंडला.....

बोल ओठात होते ते शब्द तू का कोंडले
स्पर्शात जादू भरुनी बघ चांदणे ओसंडले.....

ध्यास उबदार होता तव श्वास दिलदार होता
पापण्यावर पहुडलो मी विसरलो माझा मला.....

राजसा बिलगून तुजला उधळले मी त्या क्षणा
भारावल्या नयनात तुझिया भेटले जणू सागरा ......

भेट ती हरवेल का तर तू अशी जवळी रहा
माळतो मी प्रेम पुष्पे तू ओंजळी वेचीत जा.....
रचन: हेमंत केतकर

No comments:

Post a Comment