दिंडी निघाली पंढरपुरा
घेऊन समतेच्या पन्था
या दिंडीचा कुणास ठेका ?
आमंत्रणाची नको तमा
जात पात न धर्म भेदही
धनिक श्रमिक एकेक दुवा
दिंडी मधुनी गात चला हो
स्वतःस विसरुनी वहात जा
मागे सोडा नाती गोती
तशीच सगळी धनसंपत्ती
प्रेम द्वेष हे विकार सारे
सामील होण्या कशास लागे?
दिंडी नसे हि असे पर्वणी
करावयाची जर असेल वारी
निघायचे तर असे शेवटी
असू द्यात हो मनी तयारी
चला चला हो पंढरपुरा
भेटू या त्या विठूरायाला
रचना : हेमंत केतकर
No comments:
Post a Comment