नद्यांचे पाणी, विहिरींचे पाणी, तळ्यातले पाणी अन समुद्राचे पाणी,
पाणी होते म्हणून सृष्टीने गायली उत्क्रांतीची
आपुली गाणी.....
पाण्याने जीव-सृष्टी घडवली, पाण्याने
संस्कृती वसवली,
पाणी होते म्हणून देशाने लिहिली समृद्धीची
सुपीक कहाणी...
प्रजेने अमुच्या राने जंगले उजाडली, जरी आम्ही अनेक धरणे बनवली,
पण निसर्ग-चक्र तोडले अन शिल्लक डोळ्यात
फक्त पाणी.....
पाण्यावाचून वीज हरपली, पाण्यावरून जनताही
खवळली,
उरले आता राजकारण,पाण्याची पळवापळवी,कुणी
नाही वाली....
देशांनी इतर त्यांची वाळवंटे फुलवली,
इस्रायली बोलती भारतात किती पाणी!
तोच तो नियोजनाचा अभाव, ही चालूच आमुची
रडगाणी....
कुणाला दुष्काळ हीच पर्वणी, संधिसाधू भरून घेतात
झोळी,
हे असे किती काळ सोसायचे ? ही पुढे चालू
अनुत्तरीत कहाणी.......
रचना: हेमंत केतकर
No comments:
Post a Comment