Thursday, January 16, 2014

का?

का?
प्रेम म्हणे उदात्त असते
कात टाकताना मन का दुबळे होते?
भक्ती म्हणे उत्कट असते
श्वान लाथ खाताना शेपूट हलवीत का राहते?
बुद्धी म्हणे सत्य असते
तत्वभंग होताना बुद्धी का समर्थन करते?
चारित्र्य म्हणे शुद्ध असते
चिखल उरी दाटताना नदी का स्तब्ध होते?
रचना: हेमंत केतकर

No comments:

Post a Comment