बँकेमध्ये
लाल रंगाच्या चलनानी पैसे काढले जायचे. इतर सर्व रंगाची चलने बँकेत पैसे
भरण्यासाठी होती. तसेच ठेवी गोळा करणारा स्टाफ आणि कर्जपुरवठा करणारा
स्टाफ यात थोडी अहंमान्यता आणि दुसर्या गटाबद्दल तुच्छता असायची. या
वृत्तीला उद्देशून खालील काव्य केले होते. बघा आवडते का?
जमा नावे चलनांची एकदा लागली लढाई
छातीवर मुठ आपटून मारू लागले बढाई
जमा चल बघ म्हणे रंग माझे कसे?
पिवळे,हिरवे,निळे, सफेद जसे खाते तसे!
लक्ष्मीचे आगमन होते फक्त माझ्या वाटे
लाल्या तू मात्र फोडीत राहतो ठेवींना फाटे
माझ्या शिवाय तुला मुळी अस्तित्व ते काय?
बँकेचे मी असेन डोके तर तू किरकोळ पाय
लालू म्हणे पुरे तुझी फुशारकी अन चेव
बँक तुझी एकट्याची का लागून गेली ठेव
माझ्या बिगर तुझ्या रंगा येईल अवकळा
अरे, माझ्याविना सुकून जाईल लक्ष्मीचा मळा
मी घुमावतो त्या पैशाला मग असे नफा- तोटा
खरच तू आहेस अगदी नर्मदेतला गोटा.......
शाखाधिकारी म्हणे लावलाय काय गोंगाट तुम्ही सारा
पुरे करा, बस करा नाहीतर चढेल माझा पारा
वेड्यानो तुम्ही आहात पुरा बँकेचा श्वासोश्वास
तुम्ही दोघे असाल तेव्हाच वाढतो माझा विश्वास
जम्या जेव्हा होशील ना तू रथाचा घोडा
लाल्या होईल चाके पण थांबशील का थोडा?
दोघावाचून कसा पळेल रथास पडेल खोडा
सारथीहि हताश होईल तेव्हा भांडण सोडा
तेव्हापासून जमा नावे सुखे नांदू लागले
जोडीने रोज बँकेमध्ये हसू खेळू लागले
रचना: हेमंत केतकर
जमा नावे चलनांची एकदा लागली लढाई
छातीवर मुठ आपटून मारू लागले बढाई
जमा चल बघ म्हणे रंग माझे कसे?
पिवळे,हिरवे,निळे, सफेद जसे खाते तसे!
लक्ष्मीचे आगमन होते फक्त माझ्या वाटे
लाल्या तू मात्र फोडीत राहतो ठेवींना फाटे
माझ्या शिवाय तुला मुळी अस्तित्व ते काय?
बँकेचे मी असेन डोके तर तू किरकोळ पाय
लालू म्हणे पुरे तुझी फुशारकी अन चेव
बँक तुझी एकट्याची का लागून गेली ठेव
माझ्या बिगर तुझ्या रंगा येईल अवकळा
अरे, माझ्याविना सुकून जाईल लक्ष्मीचा मळा
मी घुमावतो त्या पैशाला मग असे नफा- तोटा
खरच तू आहेस अगदी नर्मदेतला गोटा.......
शाखाधिकारी म्हणे लावलाय काय गोंगाट तुम्ही सारा
पुरे करा, बस करा नाहीतर चढेल माझा पारा
वेड्यानो तुम्ही आहात पुरा बँकेचा श्वासोश्वास
तुम्ही दोघे असाल तेव्हाच वाढतो माझा विश्वास
जम्या जेव्हा होशील ना तू रथाचा घोडा
लाल्या होईल चाके पण थांबशील का थोडा?
दोघावाचून कसा पळेल रथास पडेल खोडा
सारथीहि हताश होईल तेव्हा भांडण सोडा
तेव्हापासून जमा नावे सुखे नांदू लागले
जोडीने रोज बँकेमध्ये हसू खेळू लागले
रचना: हेमंत केतकर
No comments:
Post a Comment