खेड्यामधले घर कौलारू ऐकत होतो एक दिवस
ग.दि.मांच्या प्रतिभेला दाद देत होतो मान हलवत
तेवढ्यात आली आमची मुक्ता म्हणे बाबा तुम्हीही कराना कविता
फुकटची गाणी कुठली हो ऐकता ओनरशिप फ्ल्याटवर करा कि कविता
मी म्हटले ओ.के. बॉस! ओनरशिप फ्ल्याट आमचाच खास
सिमेंटच्या भिंती, सिमेंटचे छत, वॉटर प्रूफिंगचा छतावर थर
पायाखालती आहेत ग्लेझ्ड टाइल्ल्स, स्टेशन फक्त सिक्स माइल्ल्स!
भिंतीना आहेत कलर्ड वॉल पेपर्स, दिमाखदार आहे हा टू रूम किचन
खिडक्यांवर आहे पेल मेटचा साज, मधून ऐकू येतो टिंग टोंग चा आवाज
भिंतीना आहे स्कर्टइंग चा रुबाब, हवा नि उजेड यांना अगदी फ्री वाव
सनमायका फोर्मायका आहे फर्निचर, बाल्कनीत वारा गातो गाणे फ़र फ़र
असा ओनरशिप फ्ल्याट आहे डौलदार, किती व्हाईट किती ब्लैक विचारू नका
एवढे वर्णन ऐकून म्हणाल तुम्ही मला, स्वतःचा ब्लॉक मग काय बुवा
सुखात रहाता झोकात रहाता नशीबवान आहात, नशीबवान आहात
पण
पण खरी गोष्ट सांगू तुम्हाला? करू नका बर कुठेच बोलबाला
एकच गोची बोचतेय मला, मी पार मुकलोय घर पणाला, कारण!
कारण या घरात नसतेच कुणी दिवसा, जरी रोज रात्र येते मुक्कामाला
मग घर आणि लॉज यात फरक काय? ट्याक्स भरताना मी मात्र झालो गरीब गाय
दिवसभर उजाड असलेला हा माझा ब्लॉक, याच्या भिंतीही पार निर्जीव होतात
माझ्या घामाघामातून उभारलेल्या साऱ्या वस्तू तरी मला त्या का परक्या वाटतात?
या घरात नाही माणसांचा आवाज, पावसात भिजतो पण दिसतो भकास
उजेडात न्हातो तरी भगभगताच प्रकाश, नातवाला कुठे इथे आजोबांचा ध्यास?
कौलारू घरासारखा नाहीच हा खास, कुठे दरवळतो इथे पारिजातकाचा सुवास?
रहाट्याच्या गाण्याऐवजी मोटारचा आवाज, निसर्गाची चाहूल नाही हरवलाय ऋतुराज
पूर्व दिशेला एक रस्ताही वाहतो, पण नुसताच वाहनांचा गोंगाट
कसा चढवू तुम्हीच सांगा कवितेला, ग.दि. मांसारखा प्रतिभेचा साज?
रचना: हेमंत केतकर
No comments:
Post a Comment