स्वप्नात विहरली तू, भेटीस वाट बघुनी
नदीचा प्रवाह गाई वाऱ्यात सूर मिळूनी
सांभाळ त्या बटाना, लाजुनी मोर भिजला
तो वृक्ष एक मोठा, सोबतीस मित्र तुजला
पारावरी उभी तू, जप तो खट्याळ वारा
भिडूनी खुशाल अंगा, उडवून देत पदरा
तो येत नाही अजुनी, हा प्रश्न एक तुजला
दाबून दात अधरी, पुसतेसहि तू स्वतःला
विसरुनी आज गेला? अपुल्याच आर्जवाला
खेळात दंग झाला? तो शाम सोबत्यांच्या?
क्षण एक फक्त तुजला, भासे प्रदीर्घ झाला
नजरेस भार वाढे, निरखूनी त्या पथाला
मन मोहरून आले, त्याच्या स्मरूनी खोड्या
तो एकमेव राजा भिनभिनतो हृदय नाड्या
या रोजच्याच भेटी, तरी त्या हव्या हव्याशा
हितगुज रोजचे ते, परी गाठी नव्या नव्याशा
रचना: हेमंत केतकर
No comments:
Post a Comment